Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘जय श्रीरामच्या’ ना-यावर चिंता, 49 विचारवंतांनी दिले मोदींना पत्र

pm modi 2

नवी दिल्ली प्रतिनिधी । देशभरात मॉब लिंचिंग व ‘जय श्रीराम’ नावाचा नारा न लावल्यामुळे होणाऱ्या मारहाणीच्या विविध घटनांवरून क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पत्र पाठवत चिंता व्यक्त केली आहे.

लोकांना ‘जय श्रीराम’च्या नावाखाली चिथावणी दिली जात आहे. दलित, मुस्लीम आणि वंचित समाजातील लोकांना मारहाण करून ठार मारलं जात आहे. या घटना रोखण्यासाठी तात्काळ कठोर पाऊल उचलण्यात यावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मोदींकडे केली असून या पत्रावर रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप, शुभा मुद्गल, अपर्णा सेन, कोंकणा सेन शर्मा आदींच्या सह्या केल्या आहेत. मुस्लीम, दलित आणि अल्पसंख्याक समाजातील लोकांना मारहाण करून ठार मारलं जात आहे. या घटना तात्काळ रोखल्या पाहिजेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी पाहून आम्हाला धक्का बसला आहे. २०१६ मध्ये दलितांविरोधात हिंसाचाराच्या ८४० घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनांमधील दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे. या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version