Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णी येथे श्री त्रिविक्रम मंदिर पूजेनंतर बंद !

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील खान्देश प्रतिपंढरपूर नगरीतील भगवान श्री त्रिविक्रम मंदिरात रात्री उशिरापर्यंत पूजा विधी व अभिषेक करण्यात आले असून भगवान श्री त्रिविक्रम देवाजी पूजा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड व सरोजिनी गरुड यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर मंदिर बंद करण्यात आले होते. 

यावेळी दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला ब्राह्मण वृंद व मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली त्यानंतर सकाळी ५ वाजेपासून मंदिर बंद करण्यात आले त्यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांचा हिरमोड झाला दिवसभर मंदिर बंद असतांनाही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता, कोरोना संसर्ग नियमावली मुळे गेल्या दोन वर्षातील आषाढी व कार्तिकी एकादशीला आपल्या भगवंताचे दर्शन होत नाही. तरीही भक्त मंदिराच्या समोरील गेटवर माथा टेकवून येत असल्याचे दिसून येत होते. अभिषेक व पूजा विधी आटोपल्यावर संजय गरुड यांनी जामनेर तालुक्यातील जनतेच्या आरोग्यम्य सुख समृद्धी साठी भगवान श्री त्रिविक्रम देवाला साकडे घातले असल्याचे सांगितले. भगवान श्री त्रिविक्रम कृपेने शेंदूर्णी व परिसरातील जनतेवर कधीही ओला किंवा कोरडा दुष्काळ पडला नाही किंवा कुठल्याही प्रकारचे नैसर्गिक आपत्ती संकट आले नाही तीच कृपा जामनेर तालुक्यातील जनतेवर परमेश्वर ठेवील अशी कामना करतो असे सांगितले, श्री त्रिविक्रम मंदिर ट्रस्टी शिरीष भोपे, भुपेश भोपे व कडोबा महाराज संस्थान गादी वारस हभप शांताराम भगत यांनी कोरोना काळाचे संकट लवकरच दूर होऊन भगवान व भक्त यांच्यातील दुरावा संपेल भक्तांना आपल्या भगवंताचे दर्शन होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.

 

Exit mobile version