Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा शहरात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

09e41fe7 8559 4000 83e3 c9368f689a35

 

चोपडा ( प्रतिनिधी) शहरात श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रम राबवून  साजरी करण्यात आली.

 

दुपारी चार वाजता महाराजांची पालखी शहरातील विविध मार्गाने मिरवणूक काढुन संध्याकाळी न्हावी वाडा येथे नाभीक समाजाच्या पंच मढी येथे समारोप करण्यात आला. यावेळी नाभीक समाजाचे शहर अध्यक्ष मनोहर सोनगिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाराष्ट्र सह देशातील दुष्काळी परिस्थिती कायमची दूर व्हावी अशी प्रार्थना मी श्री संत सेना महाजन यांच्या चरणी करतो.
यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार जगदीश वळवी,चंद्रहास भाई गुजराथी,यांनी श्री संतसेना महाराज यांच्या प्रतीमा पूजन केले,यावेळी तालुका अध्यक्ष रवींद्र सेंदाने, शहर अध्यक्ष मनोहर सोनगिरे, उमाकांत निकम,सुभाष सेंदाने, नंदलाल वाघ,शत्रुघ्न सोनवणे, सोपान बाविस्कर,दिनेश जगताप,बापु पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, अनील पवारविलास निकम,,राजू निकम,अर्जुन निकम, लक्ष्मण बाविस्कर, छोटु खोंडे,किरण शिरसाठ, देवेंद्र बाविस्कर, भरत सेंदाने,गोकुळ सोनगिरे, राहूल निकम,राजू येशी,हिरालाल सोनवणे,गणेश खोंडे, डॉ, ललित सेंदाने, दत्ता सेंदाने,भूषण जगताप,यांच्यासह तालुक्यातील मोठया प्रमाणात नाभीक समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version