Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गण गण गणात बोते : वारी करून परतली श्री संत गजानन महाराज पालखी !

शेगाव-अमोल सराफ | नुकत्याच पार पाडलेल्या आषाढी वारीचा सोहळा आटोपून संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखी आज सकाळी मोठ्या उत्साहात परतली आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार रे संत नगरी शेगांव मध्ये आज भाविकांची मांदियाळी आहे दोन महिन्याच्या आषाढी वारी करतात गेलेल्या श्री यांची पालखी पंढरपूर वारी नंतर आज शेगाव मध्ये दाखल झाली आहे. वारीचे यंदा ५४वे वर्ष आहे.

काल रात्री पालखीचा खामगाव येथे शेवटचा मुक्काम होता. आज पहाटे चार वाजता ही पालखी शेगाव करता रवाना झाली. यासोबत दरवर्षी वाढत जाणारी भाविकांची संख्या यावर्षी लक्षणीय जवळपास लाखापेक्षा जास्त भावीक खामगाव ते शेगाव करता १६ किलोमीटरच्या सहभाग घेत असतात. महिला, बाल ,वृद्ध या सर्वांचा यात समावेश असतो. डोळ्याचा पारणं फेडणार हे दृश्य पाहून परिसर मंत्रमुग्ध होऊन जातो.

दरम्यान, जवळपास सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान शेगावत श्री चे पालखी शहरात आगमन झाले. जवळपास दोन तासाच्या विश्रामानंतर पालखीची नगर परिक्रमा सुरू होणार आहे. आणि त्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने भाविकांच्या स्वागता ंची पालखी संध्याकाळी मंदिरात दाखल होणार आहे. त्यानंतर समारोप सोहळा पाहण्याकरिता लाखो भाविक एक गर्दी करत असतात. एकंदरीत दोन महिन्याच्या प्रदीर्घ पायी दिंडीचे हरिनामाचा जप ,भजन, कीर्तन रिंगण सोहळा आदींना अनुभवण्यासाठी लाखो भाविक संत नगरी शेगावमध्ये दाखल झाले आहेत.

Exit mobile version