Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात श्री परशुराम जन्मोत्सव उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी चौकातील श्री दत्त मंदिरात श्री परशुराम जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करुन बंधू-भगिनींनी आरती केली.

सुरवातीला  श्री परशुरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी संजय कुळकर्णी ह्यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत खटोड ह्यांनी शोभा यात्रेविषयी माहिती दिली. बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांतजी व बहुभाषिक महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई खटोड, रमेश व अर्चना व्यास, अविनाश व  शैलेश पंडित, सतीशजी मदाने, संजय व स्वाती कुळकर्णी, अनंतराव व अश्विनी जोशी, ह्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

श्रीरंग पुराणकर, साधना व आनंद दामले, अंजली व श्यामकांत धवसे, व नितीन कुळकर्णी, मंगला नाईक, राजेंद्र व सुनीता कुळकर्णी, शशिकांत जोशी, सुनीता नाईक, सिंधुमती वरणगावकर उपस्थित होते. सरोज पाठक, सुनीता सातपुते, मेघा नाईक, देवेंद्र मोरदे, माधुरी फडके, सविता नाईक, वैशाली ढेपे, गायत्री जोशी, भारती राव, अविता जोशी, वैदेही नाखरे ह्यांनी सहकार्य केले.

सुरभिच्या अध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले. भगवान श्री परशुरामांच्या जय घोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ह्यावेळी गणेश कॉलनी, खाजमिया, रिंगरोड परिसर व सुरभिचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version