Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दगडूशेठ गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव यंदा मंदिरातच; १२७ वर्षांची परंपरा खंडीत

पुणे वृत्तसंस्था । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने होत असून सार्वजनिक गणेशोत्सवास सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी स्वत;हून पुढाकार घेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध दगडूशेठ गणपती ट्रस्टनेही यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा होईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे, गेल्या 127 वर्षांच्या परंपरेत प्रथमच खंड पडला आहे.

 

पुण्यातील दगडूशेट गणपती उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दरवर्षी दगडूशेठ गणपती विराजमान होतो. . पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

Exit mobile version