Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; नराधमाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेशी ओळख निर्माण करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर महिलेने कागदावर स्वाक्षरीसह दागिने देण्यास नकार दिल्याने महिलेला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण निलेश पाटील (रा. खेडी, ता. जळगाव) याला अटक असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

जळगाव शहरातील एका परिसरात महिला वास्तव्यास असून त्यांची भुषण पाटील याच्यासोबत ओळख निर्माण झाली. दरम्यान, भुषण पाटील याने महिलेशी जवळीक साधून तिच्यावर शहरातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घेवून जात तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचाराचा व्हीडीओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत भुषण पाटील याने महिलेेकडून सुमारे तीन ते चार लाखांचे दागिने घेतले. तसेच महिलेला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. परंतु महिलेने स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने भुषण पाटील याने त्यांना मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली.

महिलेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार भुषण निलेश पाटील याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे हे करीत आहे.

Exit mobile version