Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय महिला ही आपल्या मुलगा व नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावात राहणारा महेंद्र गोविंद गुजर याने महिलेला मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच याला प्रतिकार केला असता महिलेवर विळ्याने वार करून हाताला दुखापत केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महेंद्र गोविंद गुजर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.

Exit mobile version