Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : बनावट रेशनकार्ड तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तहसील कार्यालयात बनावट सही शिक्के व बनावट शिधापत्रिका (रेशनकार्ड) बनवून शासनाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तहसील कार्यालयात गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेला बनावट सही शिक्क्यांचा वापर करून बनावट रेशनकार्ड अर्थात शिधापत्रिका तयार करून शासनाची दिशाभूल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये संशयित आरोपी अजाबराव सिताराम पाटील आणि पांडुरंग जयराम पाटील दोन्ही रा. चिखली ता. मुक्ताईनगर यांनी १४ ऑक्टोबर २०२० ते १४ फेब्रुवारी २०२२ च्या कालावधीत तहसील कार्यालयातच बनावट सही शिक्के व बनावट रेशनकार्ड तयार करत असल्याचा धक्कादायक माहिती समोर आल्याने मुक्ताईनगर तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांवर प्रभारी पुरवठा निरीक्षक प्रदीप धनुसिंग आडे (वय-४२) रा. नांदेड यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.

 

Exit mobile version