Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : फिरायला जाण्याचे सांगून तिन मैत्रिणींवर अत्याचार !

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तीन अल्पवयीन मुलींना बाहेर फिरायला बोलावून तीन नराधमांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे. अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन तिन्ही मुली एकाच गावात राहणाऱ्या होत्या. काही दिवसांपासून ३ मुले या तिघींचा पाठलाग करत होते. पाठलाग करताना त्यांनी मुलींशी संवाद साधला. गोड गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात खेचले. त्यानंतर त्यांना बाहेर फिरायला बोलावले. आपल्याला गावाबाहेर फिरायला मिळणार या विचाराने मुली देखील तयार झाल्या.

तिन्ही मुली २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता  तरुण त्यांना दुचाकीवर घेऊन कौठुळी गावाच्या दिशेने निघाले. आपल्यासोबत पुढे घात होणार आहे.  प्रवासात अचानक तरुण मुंलींना वाटेतील एका लॉजवर घेऊन गेले. तेथे त्यांना जबरदस्ती करत तिघींवरही लैंगिक अत्याचार करण्यात आला. झालेला प्रकार मुलींनी आपल्या घरी कुटुंबीयांना सांगितला. हे सर्व ऐकून मुलीच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मुलींना घेऊन पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलांबाबत तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार, आटपाडी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

Exit mobile version