Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : खिचडी बनविणाऱ्यां काकुंवर विद्यार्थ्यांची जबाबदारी (व्हीडीओ)

57b25ca4 04b9 4213 a9e3 4c583a83916e

रावेर प्रतिनिधी। येथील जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांची बहुतांश जबाबदारी वेळा खिचडी बनविणाऱ्या काकुंवर असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत असून त्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहे. यावर वरिष्ठ अधिका-यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ च्या प्रतिनिधीने शाळेत प्रत्यक्ष भेट दिली असता, अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. या शाळेमध्ये पहिलीच्या वर्गात एक विद्यार्थी, दुसरीच्या वर्गात 5, तिसरीच्या वर्गात 4 तर चौथीच्या वर्गात 1 असे एकूण 10 विद्यार्थ्यांवर ही शाळा सुरु आहे. या शाळेतील शिक्षक कायम कामानिमित्ताने बाहेर गेले असतात. मुलांना खिचडी तयार करण्यासाठी येणाऱ्या निर्मलाबाई विद्यार्थ्यांवर लक्ष्‍ा ठेवत असतात.

 

प्रस्तुत प्रतिनिधीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता,त्यांना साधी बाराखडीही येत नसल्याचे दिसून आले. तसेच विद्यार्थ्यांना पाढे देखील येत नाहीत. इंग्लिश विषयाची तर अवस्था फारच खराब आहे. येथे शिक्षकांनी पुर्णपणे शिक्षणाची खिचडी करून ठेवली आहे. एकीकडे देशात सरकार गरीब मुलांचे शिक्षण दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे शहरातील जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षणाची खिचडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, रावेरच्या मराठी शाळेकडे शिक्षण विभागाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

 

Exit mobile version