Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : विद्यार्थ्यांना घेवून निघालेली नाव उलटली; १८ जण बेपत्ता

पाटणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बिहार राज्यातील मुजफ्फरपूर येथे गुरूवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली नाव (बोट) बागमती नदीत उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बोटीत ३४ विद्यार्थीं होते. त्यापैकी १९ विद्यार्थीं बेपत्ता झाले आहे. या दुर्घटनेमुळे बिहार राज्यात खबळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्या शोध कार्यकार्य सुरू कनण्यात आले आहे.

 

एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर  मदत आणि बचावकार्य करणारी यंत्रणा पोहोचण्यास तासापेक्षा जास्त अवधी लागला. त्यामुळे मुजफ्फरपूरमधील नागरिकांच्या संतापाचा पारा चढला. सध्या एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोध आणि बचावकार्य सुरु आहे.

 

मुजफ्फरपूरमध्ये गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी सकाळी एक नाव विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या नावेत ३४ विद्यार्थी होते. बागमती नदीतून जाताना अचानक नाव डळमळू लागली. काही अंतरावर गेल्यानंतर ही नाव उलटली. स्थानिक रहिवासी राकेश कुमार यांनी सांगितलं की, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवले होते. यामुळेच नदीच्या मध्ये पोहोचल्यानंतर बोट डळमळू लागली. यानंतर बोट अनियंत्रित होऊन उलटली. नाविक आणि त्याच्या सहकाऱ्याने आधी काही मुलांना वाचवले. यानंतर स्थानिक लोकांनीही नदीत उडी घेतली आणि काही मुलांना बाहेर काढले. उर्वरित बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे.

Exit mobile version