Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय बालिकेचा मृतदेह कडबा कुट्टीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा हा प्रकार उघडकीला आल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कल्याणी संजय पाटील (वय-७) रा. गोंडगाव ता. भडगाव असे मयत बालिकेचे नाव आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कल्याणी संजय पाटील ही सात वर्षाची बालिका बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या पालकांनी भडगाव पोलीस ठाण्यात धावघेवून ३० जुलै रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार सुरूवातील बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान बालिकेचा तपास सुरू असतानाच मंगळवारी १ ऑगस्ट रोजी गावातील गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात तिचा मृतदेह सापडला.

ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते, भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. हा प्रकार उघडकीला आल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version