Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : विजय मिरवणूकीवर दगडफेक; एकाचा मृत्यू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज ग्रामपंचायतीचा सर्वत्र निकाल जाहीर करण्यात आला. बहुतेक ठिकाणी विजयाची मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द गावात विजय मिरवणूकीत झालेल्या दगडफेकीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीची निवडणूकीची मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द ग्रामपंचात निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार गावात गेले असता त्यांच्यावर विरोधी गाटाच्या पॅनलकडून काही लोकांनी जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत धनराज शिवराम माळी रा. टाकळी खुर्द या तरूण गंभीर जखमी झाला होता. त्यांला तातडीने जामनेर येथील उपजिल्हाप रूग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमूळे टाकळी खुर्द गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जामनेर पोलीसांनी गावात धाव घेतली आहे.

Exit mobile version