Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक ! उसने घेतलेले पैसे न दिल्याने अल्पवयीन मुलीवर १५ दिवस डांबून अत्याचार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातून एक धक्कादायक आणि अतिशय संतापजनक अशी घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला 15 दिवस डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे न दिल्याने आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पीडितेला 15 दिवस लाँजमध्ये डांबून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. पुण्यातील 3 लाँजमध्ये जाऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. हा सगळा प्रकार मागील ऑक्टोबरपासून सुरू होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पूनम माने (वय 22) आणि आकाश माने (वय 24) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. तसेच पूनम माने हिला पोलिसांनी अटक केलीय. तर तिचा नवरा आकाश हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील आजारी असताना त्यांनी फिर्यादी दाम्पत्याकडून उपचारासाठी 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र काही कारणामुळे फिर्यादी यांना ते पैसे परत देता येत नसल्याने आरोपींनी तिला एका लॉज वर नेऊन तिला १५ दिवस डांबून ठेवलं. या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने वारंवार बलात्कार केला. यावरच न थांबता या दांपत्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने शरीर विक्रीस भाग पाडले आणि तिला वेशव्याव्यसाय करून आरोपींनी पैसे कमावले

पोलिसांना काल पुण्यातील के के मॉल जवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. आता ज्या लॉज वर हे प्रकार घडले आहेत त्या सर्व लॉज मालकांची देखील चौकशी आता पोलीस करणार आहेत. याप्रकरणी आकाश ची पत्नी पूनम हिला अटक केली असून आकाश माने सध्या फरार आहे.

Exit mobile version