Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी केलेल्या अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नाना बारकू सोनवणे याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली. हा धक्कादायक प्रकार उघडकीला आल्यानंतर पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी नाना सोनवणे याच्यावर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहे.

Exit mobile version