Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : आधी लग्नाचे आमिष, नंतर बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर केला अत्याचार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आधी लग्नाचे आमिष दाखवत एका ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर त्यानेच लग्नाला नकार दिला. तरीही तिच्यासोबतचे व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करून पुन्हा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी गुरूवारी ६ जून रोजी दुपारी १२ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात ३२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. या महिलेची भुमेश बापू निंबाळकर वय २६ रा. अयोध्या नगर, या तरूणाची ओळख निर्माण झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम संबंधातून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. याचे त्याने व्हिडीओ देखील करून ठेवला होता. त्यानंतर भुमेशने महिलेला लग्नास नकार दिला. त्यामुळे महिलेने त्याच्या सोबत संबंध तोडले होते. असे असतांना भुमेशने महिलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. ही घटना २१ मे २०२१ ते २५ मे २०२४ दरम्यानच्या काळात घडली. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत महिलेने अखेर शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अखेर गुरूवारी ६ जून रोजी दुपारी १२ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भुमेश बापू निंबाळकर वय २६ रा. अयोध्या नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर ह्या करीत आहे.

Exit mobile version