Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : अत्याचारातून मुकबधीर अल्पवयीन मुलगी गर्भवती; एकाला अटक

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी मुकबधीर १६ वर्षीय मुलीवर दोन जणांनी गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून इतर फरार आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी मुकबधिर १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही मुकबधिर असल्याचा गैरफायदा घेत गावातील दिपक नाना भिल आणि लखन उर्फ अंकुश बुध भिल यांच्यासह इतर काही मुलांनी तिला गेल्या सात महिन्यांपासून शेतात घेवून जावून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या वडीलांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी ३० जानेवारी रोजी रात्री अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी  दिपक नाना भिल आणि लखन उर्फ अंकुश बुध भिल यांच्यासह इतर गल्लीतील मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहे.  यातील संशयित आरोपी लखन उर्फ अंकुश बुध भिल  याला अटक केली आहे.

Exit mobile version