Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : अल्पवयीन मुलीचा बालविवाह !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील लोंजे गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथील रहिवासी असून सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे वास्तव्याला आहे. १५ जून २०२१ रोजी दुपारी १ वाजता अल्पवयीन मुलीचा बालविवाह गोकुळ कैलास पवार यांच्याशी करून दिला.

दरम्यान अल्पवयीन मुलीला लग्नाबाबत काहीएक कळत नसल्याची माहित असताना देखील हा गुन्हा केला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी चौकशी केली. त्यानंतर १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पती गोकुळ कैलास पवार, चुलत सासरे अरुण फुलसिंग पवार, चुलत दीर सजन रतन पवार, सासरे कैलास फुलसिंग पवार, चुलत दीर ज्ञानेश्वर बाबुलाल पवार, दीर धनराज कैलास पवार, चुलत दिर रवींद्र युवराज पवार (सर्व रा. लोंजे ता.चाळीसगाव), भाऊसाहेब रामलाल सोनवणे, अल्पवयीन मुलीची आई विमलबाई सोनवणे, सावत्र आजोबा अण्णा अभिमन मालिक, आजी कलाबाई अण्णा मलिक (चौघे रा. मालेगाव जि.नाशिक) यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे करीत आहे.

 

Exit mobile version