Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : वकीलाच्या वेशातील हल्लेखोरांचे दिल्ली कोर्टात हत्याकांड

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतल्या कोर्टात वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी बेधुंद गोळीबार करून एका मोस्ट वॉंटेड गुन्हेगाराची हत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यात चौघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की,  दिल्लीतील रोहिणी कोर्टातच थरारक हत्याकांड झालं. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर एक गँगस्टरही ठार झाला आहे. भर दुपारी आरोपींनी वकिलाचा वेश परिधान करुन कोर्टात प्रवेश केला. यानंतर जितेंद्र उर्फ गोगी याला गोळ्या घालण्यात आल्या.. त्या दरम्यान न्यायालयाच्या आवारात गोळीबाराचा थरार झाला. यावेळी हल्लेखोरही ठार झाले. या गोळीबारात आतापर्यंत चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक गँगस्टर जितेंद्र आहे, तर जितेंद्रवर हल्ला करण्यासाठी आलेल्या तीन हल्लेखोरांचाही समावेश आहे.

दिल्लीच्या टिल्लू टोळीने जितेंद्रची हत्या केल्याचा संशय आहे. जे हल्लेखोर ठार झाले आहेत त्यातील एकाचं नाव राहुल आहे. गुंड जितेंद्रला दोन वर्षांपूर्वी गुरुग्राममधून स्पेशल सेलने अटक केली होती. गोगीच्या टोळीची दिल्लीसह परिसरात मोठी दहशत होती. आज त्याला कोर्टात आणले जात असतांनाच त्याचा खात्मा करण्यात आला.

 

Exit mobile version