Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : चुलत मामेभावाकडून तरूणीवर अत्याचार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील एका १९ वर्षीय तरूणीवर चुलत मामे भाऊ याने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

दिलेल्या फिर्यादीनुसार १९ वर्षीय तरूणीचा चुलत मामे भाऊ नितीन प्रल्हाद अहिरे याने तिच्याशी मैत्री करून त्याच्या घरी व फर्दापूर येथील लॉजवर वेळोवेळी अत्याचार केला. संशयिताने अत्याचार केल्याची व्हिडीओ काढून तिला दाखवत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्यासोबत केलेले अत्याचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर मित्रांना प्रसारित केले. पिडीत तरूणीच्या नातेवाईकांना याचा जाब विचारला असता त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. पीडीतेसह नातेवाईकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चुलत मामे भाऊ नितीन प्रल्हाद अहिरे, चुलत मामा प्रल्हाद दशथ अहिरे आणि चुलत मामी यांच्याविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नजन पाटील करीत आहे.

 

 

Exit mobile version