Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : जळगावात सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी ७ वर्षीय चिमुकलीवर एका १३ वर्षीय विधीसंघर्षीत मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात सात वर्षीय मुलगी आपल्या आईवडील व भावासोबत राहते. दरम्यान, त्यांच्या घराच्या समोर आत्याकडे १३ वर्षीय भासा राहतो. आत्याकडे ससे पाळलेले असल्यामुळे ससेंना पाला खायला देवून ससेंसोबत मुलगी खेळत होते. दरम्यान, काल रविवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी १३ वर्षीय विधीसंघर्षीत मुलाने ७ वर्षीय चिमुकलीला घराच्या छतावर घेवून जावून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार मुलीच्या भावाच्या लक्षात आला. त्याने १३ वर्षीय मुलाला शिवीगाळ केली. दरम्यान, पिडीत मुलीचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार सांगितला. वडीलांना चिमुकलीला विश्वासात घेवून घडलेला प्रकार ऐकुण घेतला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांना रविवारी रात्री शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून विधीसंघर्षीत मुलाला ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version