Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि वडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. डिसेंबर २०२० महिन्यात शहरातील एका मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी अल्पवयीन मुलगी गेली होती. त्याठिकाणी दीपक सोनवणे (पुर्ण नाव गाव माहित नाही) या मुलाशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्या मुलीला काही ना काही कारण सांगून शहरातील फुले मार्केटमध्ये बोलावून तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान ही घटना घरी कोणालाही सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना मारून टाकेल अशी तरूणाने दिली. तसेचे अल्पवयीन मुलीच्या काकाच्या राहत्या घरी देखील तिच्यावर अत्याचार केला आणि “तू जर मला भेटण्यासाठी आले नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या वडिलांना मारून टाकेल” अशी देखील धमकी दिली. या संदर्भात पीडित अल्पवयीन मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक सोनवणे (पूर्ण नाव गाव माहीत नाही) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

Exit mobile version