Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Shocking : मुलाला मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; दोन जणांना अटक

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक (Shocking) प्रकार समोर आला. तर जाब विचारण्यासाठी आलेल्या पतीला देखील बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की,  तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहिता पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. १९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान विवाहिता ही बकऱ्यांसाठी चारा आणत असतांना संशयित आरोपी नितीन एकनाथ जाधव याने विवाहितेला तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. विवाहितेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितले. याचा जाब विचारण्यासाठी विवाहितेचा पती संशयित आरोपी नितीन जाधव याच्याकडे गेला असता सोनाली जाधव, संदीप जाधवी, नितीनचा पाहुणा, नितीनीची आत्या जिजाबाई, सुनिता वाल्मिक जाधव, लिलाबाई जाधव, अनिल देविदास काळे यांनी विवाहितेच्या घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली. आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली . त्यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली. पुढील तपास पोउनि विजया वसावे हे करीत आहे.

Exit mobile version