धक्कादायक : पुतण्याच्या मृत्यूची खबर ऐकताच काकूनेही सोडले प्राण !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हनुमान नगर भागातील एका २७ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती कुटुंबाच्या सदस्यांना माहित पडताच सर्वांनी एकच आक्रोश केला. यात मयत तरुणाची काकू हिने या घटनेचा धसकाच घेतला. त्यावेळीच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने जळगाव येथे उपचारासाठी जात असतांना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. या घटनेमुळे हनुमान नगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून सोनार कुटुंबातून एकाच दिवशी दोन अंतयात्रा निघाल्याने ऐन संक्रांतीच्या सणाच्या तोंडावर सोनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, शहरातील हनुमान नगर भागातील रहिवाशी दादाभाऊ मोरे व त्यांचे दोन्ही भावांचे कुटुंब एकाच ठिकाणी राहत असुन ११ जानेवारी रोजी दादाभाऊ मोरे हे यांचे काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी ता. पाचोरा येथे गेले होते. उत्तरकार्य आटोपुन आल्यानंतर त्यांचा लहान मुलगा किरण मोरे (वय – २७) हा कामानिमित्त शहरातील दुसर्‍या भागाकडे जात असतांना पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३६९ / १८ ते ३६९ / २० दरम्यान रेल्वे लाईन क्रास करत असतांना मुंबई हुन जळगांवच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव धावत्या रेल्वे (गाडी क्रं. १५५४८)चा धक्का लागल्याने किरण सोनार यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती रेल्वेचे लोको पायलट जे.एच. देवरे यांनी पाचोरा रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक यांना दिल्यानंतर त्यांनी सदरची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दिली.

पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस काॅन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या सह घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून किरण सोनार यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे. दरम्यान किरणच्या मृत्युची बातमी कुटुंबाच्या सदस्यांना मिळताच सर्वांनी एकच आक्रोश केला.

किरण ची आजी, वडिल, आई, काका व भाऊ, बहिण यांनी त्यांच्या अचानक जाण्याने करित असलेल्या दुःखद आक्रोशात त्याची काकु उषाबाई मन्नु सोनार (वय – ४०) यांना तिव्र ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले. माञ जळगावचा प्रवास करित असतांनाच सामनेर नजीक उषाबाई यांची प्राणज्योत मालवली. राञी उशिरा घडलेल्या या दोन घटनांमुळे हनुमान नगर परिसरात शोककळा पसरली. संपुर्ण हनुमान नगर राञभर जागीच होते. आज १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उषाबाई यांचा मृतदेह आणला गेला व तासाभरात किरणचा मृतदेह आणण्यात आला. काकु व पुतण्या या दोघांच्या अंत्ययाञेची तयारी एकाच वेळी करून ट्रॅक्टरवर दोघांची अंतयाञा काढण्यात आली.

किरण हा घरातील कर्ता मुलगा होता. तो तारखेडा रस्त्यावर चहा, नाष्ट्याचे दुकान चालवित होता. त्याने एक दिवसापुर्वीच रिक्षा विकत घेतली होती. त्याच्या पश्चात आजी, आई, वडिल, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. तर किरणची काकु उषाबाई ही सुध्दा त्यांच्या घरातील करती महीला होती. त्या शहरातील एका रुग्णालयात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होत्या. पतीचे एका अपघातात पायाचे आॅपरेशनही त्यांनी केले होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. काकु व पुतण्या यांचे एकाच दिवशी निधन झाल्याने हनुमान नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असुन शोककळा पसरली आहे.

Protected Content