Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : पहूर येथे एकाला टॉयलेटमध्ये कोंडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकडची जबरी चोरी

पहुर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर पेठ येथे मध्यरात्री बंद घरात अज्ञात दोन चोरट्यांनी एकाला टॉयलेटमध्ये कोंडून जबरी सोन्याचे दागिन्यांसह रोकड असा एकुण ४८ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. यासंदर्भात पहूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पहूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर सुकलाल पाटील (वय-३९) रा. होळकर नगर, पहूर पेठ जामनेर यांचे कापड दुकान असून त्यावर उदरनिर्वाह करतात. ते भाड्याच्या घरात राहतात. गुरूवारी १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ते घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात खळखळचा आवाज आल्याने सुधीर पाटील यांना जाग आली. पाहतो तर त्यांच्या घरात अज्ञात चोरटे चोरी करण्यासाठी आल्याचे दिसून आले. चोरट्यांनी सुधिर पाटील यांना धमकी देवून टॉयलेटमध्ये कोंडून दिले. व घरातील लोखंडी कपाटातून ४८ हजार ३०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केला.

याबाबत सुधीर पाटील यांनी पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.

Exit mobile version