Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : आत्याचारातून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी आईवडीलांसह वास्तव्याला आहे. आईवडील आणि भाऊ हे हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. गेल्या वर्षभरापासून अल्पवयीन मुलीने शाळेत जाणे बंद केले होते. त्यामुळे ती घरीच राहत होती. दरम्यान तिच्या समाजातील एका अल्पवयीन मुलाने तिला काहीतरी आमिष दाखवत तिच्यावर गेल्या वर्षभरापासून अत्याचार सुरू केले, या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली. गेल्या दिड महिन्यापुर्वी तिच्या नातेवाईकांमध्ये घरी गंधमुक्तीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मुलीच्या चालण्या बोलण्या वरून तिच्या आईवडीलांना संशय आला. अधिक चौकशी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पिडीत अल्पवयीन मुलीने शुक्रवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता बाळाला जन्म दिला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version