Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कात्रज घाटात शिवशाही बस कोसळली

shivshahi bas

पुणे प्रतिनिधी । राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी) शिवशाही बसला कात्रज घाटात भीषण अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपक्ष घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी असल्याचं एस.टी प्रशासनाने सांगितले आहे.

अपघातग्रस्त बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये तब्बल ४० प्रवासी होते. कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडीकडे जात असताना शिवशाही बस ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघात नेमका कशामुळे झाला, याची अद्यापही कारण समजू शकले नाही आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

Exit mobile version