Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेचे नवीन जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांचा सत्कार (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर विष्णू भंगाळे यांची शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल शिवसेना पक्ष कार्यालयात आज शुक्रवारी महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला..

 

जिल्हा शिवसेनेतील पदाधिकार्‍यांमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. गुलाबराव वाघ यांना सहसंपर्क प्रमुखपदी बढती देण्यात आली त्यामुळे जिल्हा प्रमुखपदी जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांची निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने आज शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नवीपेठेतील शिवसेना पक्ष कार्यालयात विष्णू भंगाळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आहे.  याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, विराज कावडीया, शोभा चौधरी, सरिता माळी-कोल्हे, नगरसेवक गणेश सोनवणे, शिवसेना व्यापारी आघाडीचे पूनम राजपूत यांच्यासह आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

Exit mobile version