Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेचे उमेदवार लताताई सोनवणे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

latabai sonawane news

चोपडा प्रतिनिधी । चोपडा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे, भाजप, रासप, शिवसंग्राम, आरपीआय (अ) महायुतीच्या उमेदवार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ निमगव्हाण येथील दादाजी धुनिवाले बाबा जावून केला. यावेळी तालुक्यातील निमगव्हाण, दोंदवाडे, तांदलवाडी, खाचणे, तावसे, कुरवेल, कठोरा, धनवाडी, खड्गाव, गोरगावले, गोरगावले खुर्द, खेडीभोकरी, घुमावल खुर्द, माचला आदी गावागावात जावून ग्रामस्थांशी संवाद सांधला.

यावेळी ताईंसोबत डॉ.किरण सोनवणे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, तालुकाप्रमुख मंगला पाटील, अनिल शिवाजी बाविस्कर, दिव्यांक सावंत, निमगव्हाण उपसरपंच ज्योती अशोक कोळी, गणेश भोईटे यांच्यासह प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version