Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेचे उमेदवार आ. किशोर पाटील यांच्या उपस्थितीत व्यापारी मेळावा

kishor news

पाचोरा प्रतिनिधी । शिवसेना, भाजपा महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व्यापारी मेळाव्याचे आयोजन आज येथे करण्यात आले होते. व्यापाऱ्यांच्या असलेल्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी दिला.

यांची होती उपस्थिती
शहरातील नारायण मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्यात नगराध्यक्ष अतुल पाटिल, प्रभारी नगराध्यक्ष डॉ.वसीम मिर्झा, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी, सुनिल देशमुख, शंकर मारवाडी, शशीकांत वाणी, संतोष महाजन, प्रदीप महाजन, शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे इम्रान अली सय्यद, आसिम मिर्झा, अल्ताफ खाटिक, व सर्व शिवसेनेचे मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादीला खिंडार
यावेळी या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेन्द्र आचारी, प्रमोद पाटील, संजय महाजन, कवरलाल जैन, राजेन्द्र हिरे, संतोष महाजन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Exit mobile version