Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वाइन फ्लू बाबत भुसावळात शिवसेनेतर्फे जनजागृती

भुसावळ प्रतिनिधी । शहरात स्वाईन फ्लूची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शिवसेनेतर्फे नागरिकांसाठी जनजागृती केली जात आहे.

याबाबत वृत्तांत असा की, भुसावळमध्ये मस्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरासह जिल्ह्याभरात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव वाढत आहे. शहराच्या जामनेर रोड व शांती नगर भागात मागच्या दिवसात स्वाइन फ्लूमुळे काही लोक दगावली. म्हणून आतापासून स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी नागरिकांना माहितीपत्रके वाटून जनजागृतीस प्रारंभ केला आहे. शहरातील जामनेर रोड, वरणगाव रोड, राम मंदिर वार्ड भागात भुसावळ शिवसेनेतर्फे बबलू बर्‍हाटे यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.

माहितीपत्रक छापले

शिवसेनेतर्फे दिनांक ३० जानेवारी ते १४ फेब्रुवारी पासून भुसावळ शहरात स्वाईन फ्लू जनजागृती पंधरवडा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेनेतर्फे माहिती पत्रक छापण्यात आले आहे.
स्वाइन फ्लू होऊ नये म्हणून संशयित किंवा बाधित व्यक्ती पासून किमान सहा फूट दूर रहावे, सिनेमागृह नाट्यगृह बंदिस्त वातानुकूलित मॉल अशा बंदिस्त आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, हात सातत्याने साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवावेत, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा, पौष्टिक आहार घ्यावा, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करावा, आजारी असल्यास पुरेशी झोप, आणि विश्रांती घ्यावी असे आवाहन शिवसेना संघटक प्रा. धिरज पाटील यांनी केले आहे.

खबरदारी घ्यावी

स्वाइन फ्लूबाबत आवश्यक ती खबरदारी घेणे खुप महत्वाचे आहे. जास्त शिंका आल्यावर संबंधित नागरिकाने आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयांमध्ये किंवा जवळच्या डॉक्टरांकडे प्रथमिक तपासणीसाठी जाणे गरजेचे आहे. जाताना नाका-तोंडाला चांगला प्रतिचा रुमाल किंवा मस्क बांधायला पाहिजे, उपचार घेतल्यावर हा आजार निश्‍चितपणे बरा होतो. त्यामुळे काळजी घेणे हे त्यावर प्रभावी औषध आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये या अजारांवर मोफत उपचार केले जात असल्याची माहिती पत्रकात छापली आहे.

या जनजागृतीमध्य विभाग प्रमुख निखिल बर्‍हाटे, हर्षल तळेले, सचिन चौधरी, मनीष महाजन, हर्षल चौधरी, अथर्व जोशी, रितेश पाटील, यशवंत जोशी, मानस कुरकुरे, शुभम सोनार, जयेश चौधरी, प्रवीण चौधरी, कौस्थुभ कुलकर्णी, रोहन भोळे संजू कासार, किरण फालक, मनोज खांबायत, प्रशांत बारजिभे, मयूर ढाके यांनी भाग घेतला.

Exit mobile version