शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढणार !

मुंबई प्रतिनिधी | महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाचा समावेश असला तरी गोव्यात हे तीन नव्हे तर फक्त दोन पक्षच एकत्रीत निवडणूक लढविणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आगामी गोवा विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

या संदर्भात बोलतांना खासदार राऊत म्हणाले की, गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार आहेत. १८ जानेवारीला जागावाटपावर चर्चा होईल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल १८ जानेवारीला गोव्यात जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा करतील. फक्त त्यानंतर कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस यांची युती आहे. मात्र, या क्षणी कॉंग्रेसने राज्यात इतर कोणत्याही पक्षाशी युती न करता एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या युतीत कॉंग्रेस नसेल, असे राऊत म्हणाले. आम्ही गोव्यात १०-१५ जागा लढवू, असं राऊतांनी सांगितलं.

Protected Content