Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसे महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने शिवस्वराज्य दिन अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने भीमराव पवार (जिल्हा संस्कार सचिव भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव ) यांचे “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी महाराजांनी केलेल्या स्वाऱ्या त्याच पद्धतीने महाराजांनी खऱ्या अर्थानं जनतेचे स्वराज्य निर्माण केलं. त्यासंदर्भातील अनेक आठवणींना उजाळा दिला आणि या निमित्तानं महाराजांचं स्मरण करता आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.ए. महाजन हे उपस्थित होते. त्यांनीही महाराजांच्या एकंदरीतच कार्यकर्तृत्वांवर भाष्य  केलं आणि महाराजांना यानिमित्ताने वंदन करून त्यांच्या स्मृती जागृत केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रतिभा ढाके (महिला विद्यार्थी विकास अधिकारी) यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ. संजीव साळवे (विद्यार्थी विकास अधिकारी) यांनी केले. तर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी / विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला व कार्यक्रम यशस्वी केला.

 

Exit mobile version