Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी बांधले शिवबंधन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी व महायुतीला गुढीपाडवा सभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे पक्षाच्या सरचिटणीस पदावर असलेले किर्तीकुमार शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ५ मे रोजी आज त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सध्या राज ठाकरे रत्नागिरी जिल्हयात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ गेले होते आणि इकडे त्यांचे मजबूत कार्यकर्ते पक्षाला राम राम करत आहे.

आज देशातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश- सगळीकडेच अनेक राजकीय पक्षांचे पुढारी हुकूमशाही मनोवृत्तीच्या भाजप-मोदी-शाह यांच्यासमोर अक्षरशः लोटांगण घालत असताना सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र भाजपविरोधात संघर्ष करत महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा स्वाभिमानी बाणा जपत आहे. सर्व समाजघटकांना स्वाभिमानाच्या आणि समतेच्या लढ्यातील सोबती मानणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे व्यापक बहुजनवादी हिंदुत्व, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळापर्यंत बांधलेली शि व से ना ही चार अक्षरांची अत्यंत बळकट ‘जादुई’ संघटना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुकूमशाह ‘भामोशा’ विरोधातील आपली परखड राजकीय भूमिका महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी स्वतः उद्धवजी घेत असलेले अतुलनीय, कठोर परिश्रम यांमुळे लोकसभा निवडणुकीत ही सच्ची शिवसेना आणि महविकास आघाडी दणदणीत यश तर मिळवेलच, पण त्याच बरोबर देशाच्या राजकारणालाही नवीन दिशा देईल याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही असे यावेळी किर्तीकुमार शिंदे म्हणाले.

Exit mobile version