Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सचिन अहिर अखेर ‘शिवबंधनात’

70374863

मुंबई, वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सुतोवचन केले होते. आज त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अहिर यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं.

 

यापुढं शिवसेना वाढवण्याचं काम करेन, अशी ग्वाही सचिन अहिर यांनी यावेळी दिली.हा प्रवेश सोहळा ‘मातोश्री’ पार पडला. याप्रसंगी अहिर यांच्या पत्नी संगीता अहिर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अहिर यांच्या पक्षांतरामुळं शिवसेनेचं बळ वाढणार असून मुंबईत आधीच कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे. सचिन अहिर यांनी काल संध्याकाळी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी आपल्या भावी वाटचालीची कल्पना कार्यकर्त्यांना दिली. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. आतापर्यंत जशी साथ दिलीत, तशी पुढेही द्या, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानुसार हा पक्षप्रवेश झाला.

भायखळा विधानसभा लढणार?
सचिन अहिर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र, मागील निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादीकडून लढून पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळं काळाची पावलं ओळखून त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याचं समजतं. मात्र, ते करताना त्यांनी भाजपऐवजी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे. शिवसेनेकडून ते भायखळा विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सध्या एमआयएमचे वारीस पठाण हे आमदार आहेत.

Exit mobile version