Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीचा विजय; रेल्वे प्रशासनाचे लेखी आश्‍वासन ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी आज शिवाजीनगरातील नागरिकांना रेल रोको आंदोलन करण्यासा इशारा दिला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने लेखी आश्‍वासन दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आहे.

शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुल रहदारीसाठी बंद करण्यात आल्यामुळे हजारो नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यातच वेळेत उपचार न मिळाल्याने काही रूग्णांचा बळीदेखील गेलेला आहे. यामुळे शिवाजीनरसह पलीकडच्या भागातील जनतेसाठी पर्यायी रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीने दिला होता. या अनुषंगाने या समितीतर्फे आज सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलकांनी रेल्वे थांबवण्याआधीच डेप्युटी स्टेशन मॅनेजर अरूण देशमुख यांनी रेल्वे प्रशासनाने मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्‍वासन दिले.

रेल्वे प्रशासनाने लेंडी नाल्यावरील पूल एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. याशिवाय, भुयारी पुलासाठी मनपाकडे प्रस्ताव देण्यात आलेला आहे. यामुळे शिवाजीनगर परिसरातील नागरिकांची सुविधा होणार आहे. यामुळे आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आहे. रेल्वे प्रशासनाने लेखी आश्‍वासन दिल्यामुळे शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीचा हा विजय मानला जात आहे. मात्र आता लेंडी नाल्याकडील रस्ता हा लवकरात लवकर रहदारीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

पहा । शिवाजीनगरातील नागरिकांना रेल रोको आंदोलन

Exit mobile version