Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथे मकरसंक्रांतीनिमित्त शिवाजी महाराजांचे ‘शाही स्नान’

पारोळा प्रतिनिधी । सालाबादप्रमाणे मकरसंक्रांतीला व शिवजयंती रोजी महाराजांचे शाही स्नान करण्यात येते असून  यंदा देखील आ. चिमणराव पाटील आणि पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते ‘संकल्प शाही स्नान’ सोहळा संपन्न झाला.

सालाबादाप्रमाणे मकरसंक्रातीला व शिवजयंतीला महाराजांचे शाही स्नान करून पुष्पमाळ अर्पण  केले व रोज जलस्नान करून रोज पुप्षहार अर्पण करून कायमस्वरूपी छत्रपती राजेश्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पावित्र्य सन्मानाने व आदराने टिकऊन ठेवण्यासाठी केलेल्या संकल्पाच्या अनुषंगाने आज नुतनवर्ष व मकरसंक्रातीचे औचित्य साधुन आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रेरणेने छत्रपती राजेश्री शिवाजी महाराज यांच्या पारोळा शहरातील शेतकरी सहकारी संघ आवारातील पुतळ्याची पवित्रता कायम राहण्यासाठी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते ‘संकल्प शाही स्नान’ सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी जनसेवक विजुभाऊ निकम, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, शेतकी संघ चेअरमन गणेश पाटील, चेअरमन अरूण पाटील, बाजार समिती संचालक प्रा.बी.एन.पाटील सर, संजय गांधी निराधार समिती सदस्य दादा पाटील, युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, छावा संघटनेचे विजय पाटील, राम उपरे सर, उपशहरप्रमुख भुषण भोई, युवासेना उपशहरप्रमुख सावन शिंपी, ईश्वर पाटील, पंकज मराठे, गुड्डु मराठे, शेळावे येथील सुनिल पाटील, अरूण पाटील, आबा चौधरी, आप्पा चौधरी, विचखेडे येथील प्रशांत पाटील, रोहीत बाविस्कर, शरद पाटील, सदाशिव पाटील, अशोक महाजन, पंडित पवार, प्रदिप जाधव, ज्ञानेश्वर झाल्टे, गोरख पाटील, भरत पाटील, किरण पाटील, प्रकाश चौधरी, निळकंठ बडगुजर, प्रदिप माळी, सुभाष न्हावी, रविंद्र शिंपी, मालोजी सुर्यवंशी, आदित्य निकम, आसाराम गायकवाड, ओंकार भिल, उंदीरखेडे येथील बापु महाजन, विचखेडे येथील भाऊराव पाटील, विशाल गोकुळ पाटील, भटु पाटील, भैय्यासाहेब पाटील, अनिल पाटील, शरद पाटील यांसह आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version