Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील शिवसेनेचे चर्चेअंती उपोषण स्थागित

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेने विस्तारीत वसाहतीतील लाखो रुपयांची पाणीपुरवठा योजना फसल्याने शिवसेनातर्फे उपोषण करण्यात येत असून या उपोषणाला न.प. मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी उपोषणार्थींची भेट घेत चर्चा केली. या चर्चेअंती योग्य कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यावरून शिवसैनिकांनी उपोषण स्थगित केले आहे.

शहरातील विस्तारित वस्त्यांमध्ये नव्यानेच केलेल्या लाखो रुपयाच्या पाणी वितरीकेतून नागरिकांना योग्य दाबाने तर काही भागात अजीबातच पाणी पुरवठा होत नसल्याने संबंधित ठेकेदारावर वरील कारवाईच्या मागणीसह  पाणीपुरवठा सुरळीत होईस्तोवर पाणीपट्टी माफ करण्याच्या मागणीसाठी सोमवारी येथील पालिकेसमोर  येथील शहर शिवसेनेच्या कार्यक्रर्त्यांच्या वतीने उपोषणास प्रारंभ करण्यात आले होते.

याप्रसंगी यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी उपोषणार्थींची भेट घेत केलेल्या यशस्वी चर्चेअंती योग्य कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यावरून शिवसैनिकांनी उपोषण स्थगित केले आहे.

शहरालगत असलेल्या नविन विस्तारित वस्त्यांमध्ये दुसर्‍या मजल्यापर्यंत विना मोटारीने पाणी पोहोचेल असे पालिकेकडून आश्वासन देत पालिकेकडून गेल्यावर्षीच लाखो रुपयांची पाणी  वितरिका टाकण्यात आली आहे. मात्र या वितरीकेतून विस्तारीत क्षेत्रातील वसाहतीमधील नागरिकांना योग्य दाबाने पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या येथील शहर शिवसेनेच्या वतीने गेल्या आठवड्यात पालिकेला कंत्राटदारावर कडक कारवाईच्या मागणीसह जोपर्यंत वस्तीधारकांना पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत पाणीपट्टी माफ करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते.

अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार सोमवारी येथील यावल नगर परिषद समोर शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, पप्पू जोशी, शरद कोळी, सागर देवांग, बाळासाहेब कोलते, सुनील बारी, पिंटू कुंभार, विजय पंडित, विकी बाविस्कर, सारंग बेहेडे, मयूर खर्चे , निलेश पानसरे, हुसेन तडवी, भुरा कुंभार ,डॉ.विवेक अडकमोल यांचेसह शिवसैनिकांनी उपोषणास सुरुवात केली.

मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी उपोषणार्थींशी चर्चा करत विस्तारित भागातील पाणीपुरवठा सुरळीत करून संबंधित ठेकेदाराला विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. पाणीपुरवठा सुरळीत करताना पालिकेचे खोदले जाणारे रस्त्यांचे बाबत कोणतेही अतिरिक्त देयके अदा करण्यात येणार नसल्याचेही आश्वासन पत्रात नमूद केले आहे, या चर्चेनंतर शिवसैनिकांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.

 

Exit mobile version