Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनची भूक : निरूपमांचा टोला

मुंबई । फडणवीस व संजय राऊत यांच्यातील भेटीनंतर काँग्रेसची माजी खासदार संजय निरूपम यांनी शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनची भूक असल्याचा टोला मारला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी भेट झाली. यांनंतर चर्चेला उधाण आले. या पार्श्‍वभूमिवर, काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. कंपाऊडरला कायम हेडलाईनमध्ये रहायची भूक आहे. म्हणून ते असे करत असल्याची टिका केली आहे.

संजय निरूपम यांनी राऊत यांचे नाव न घेती ही टिका केली आहे. शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइन बनून राहण्याची मोठी भूक लागलेली असते. ही भूक नेहमी त्या पक्षातील नेत्यांनाच खाते. ही दुर्भावना नसून वास्तविकता आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असे विधान केले होते. याच संदर्भाला अनुसरून निरुपम यांनी राऊत यांना टोला मारला आहे.

Exit mobile version