Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना महिला आघाडीची वाडी-शेवाळे-निंभोरी परिसरात आशीर्वाद रॅली

8e08b61b 6995 44b0 88a6 1cc8e2c1da59

पाचोरा (प्रतिनिधी) शिवसेना-भाजपा महायुतीची उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज शिवसेनेच्या महिला आघाडीची वाडी-शेवाळे-निंभोरी परिसरात आशीर्वाद रॅली काढली. यावेळी जनतेकडून रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 

माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुनीताताई किशोर पाटील यांनी वाडी – शेवाळे – निंभोरी या गावांना आज भेटी दिल्या. यावेळी त्यांनी ‘होम टू होम’ जनतेचे आशीर्वाद घेतले. या परिसरातून आमदार किशोर आप्पा पाटील हेच पुन्हा आमदार होतील, असा आशीर्वाद महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला. माजी नगराध्यक्ष सुनीताताई पाटील यांचा सध्या पाचोरा – भडगाव मतदार संघात झंझावती प्रचार दौरा सुरु आहे. या प्रचार दौऱ्यात त्यांचासोबत महिला पदाधिकारी व शिवसेनाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version