Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातील पाणी प्रश्‍नावर शिवसेना-उबाठा आक्रमक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पाणी पुरवठा सुरळीतपणे करण्यात यावा यासाठी शिवसेना-उबाठा पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या संदर्भात शिवसेना-उबाठा पदाधिकार्‍यांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, भुसावळ शहरात पाणी पुरवठ्याची समस्या आताच फेब्रुवारी महिन्यात जाणवते आहे. शहरातील जूनी पाणी पुरवठ्याची पाईप लाईन सतत लिकेज होत असल्याने नागरिकांना योग्य तो नियमित पाणी पुरवठा होत नाही. सध्या १०-१५ दिवसांनी ते ही अनिश्चित पाणी पुरवठा होत आहे. त्या मुळे आता पासूनच भुसावळकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अजून पूर्ण उन्हाळा बाकी आहे त्या मुळे आपण तत्काळ पाण्यासंदर्भात उपाय योजना करून उन्हाळ्यातील पाण्याचे संकट टाळावे.

दरम्यान, यात पुढे नमूद केले आहे की, भुसावळ नगर पालिकेच्या जागेवर अनेक कुप नलिका आहे परंतु त्या बंद अवस्थेत पडलेल्या आहे त्या कुप नलिका देखील तत्काळ दुरुस्त कराव्या. जेणे करून नागरिकांना पाण्यासाठी त्या कुप नालिकेचा फायदा होईल ,तसेच भुसावळ शहरात अनेक ठिकाणी विहिरी आहेत या विहिरींना सुध्धा पाण्याच्या मोटार लाऊन त्या ठिकाणी सुध्धा आपण जनतेला पाण्याची सुविधा उपलब्ध करू शकतो तसेच पाण्याच्या टँकर ने भुसावळकरांना पाणी पुरविण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

या निवेदनात अमृत योजनेबाबत भाष्य करण्यात आले आहे. या योजनेचे काम रखडले असून याला तात्काळ पूर्ण करावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख दिपक धांडे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, पप्पू बारसे, ऍड. कैलास लोखंडे, ऍड. नरेंद्र लोखंडे,दिलीप सुरवाडे,निलेश महाजन,बबलु बर्‍हाटे, युवा सेना जिल्हा प्रमुख सूरज पाटील,बबलु धनगर, शरद जैस्वाल, स्वप्नील सावळे, पिंटू भोई, राकेश खरारे, अरुण साळुंके, महेमूद शेख, मनोज पवार,शरद जोहरे,यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version