Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड येथे शिवसेना संपर्क अभियानाला सुरुवात

बोदवड प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना संपर्क प्रमुख संजय राऊत यांच्या सूचनेनुसार मुक्ताईनगर मतदार संघात शिवसेना संपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

या शिवसंपर्क अभियाना निमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगांव शिवसेना नेते गुलाबरावजी पाटील व शिवसेना जिल्हाप्रमूख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांचे ऊद्या मुक्ताईनगर मतदार संघातील विविध ठिकाणी आगमन होणार असून सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसह आढावा बैठका तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण असा शिवसंपर्क अभियानाचा दौरा प्रस्तावित आहे. शहरात आगमन झाल्यानंतर विविध विकासकामांचे भुमिपूजन आटोपल्यावर पुढील प्रस्तावित मुक्ताई मंगल कार्यालयात ठिक १ वाजता शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमात सर्व विभागाचे अधिकारी ऊपस्थितीत राहणार आहेत. 

प्रशासकिय समस्या, अडी अडचणी व नागरिकांच्या तक्रारींची समोरासमोर दखल घेऊन त्या सोडविण्याचे काम पालकमंत्री गुलाबराव पाटिल व शिवसेना जिल्हाप्रमूख तथा आमदार माननिय चंद्रकांत पाटिल करणार आहेत. तरी बोदवड तालुक्यातील नागरिकांनी आपल्या प्रशासकिय समस्या, अडी अडचणी या लेखी निवेदनाद्वारे वा तोंडी नियोजित कार्यक्रमाठिकाणी आणून ऊपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमूख तथा आमदार चंद्रकांत पाटिल यांनी केले आहे.

 

Exit mobile version