Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना खासदारांना धमकी देणारा अटकेत

नांदेड । परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला आज नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. 

याबाबत वृत्त असे की, खासदार जाधव यांना दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्‍तीने जाधव यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांना मारण्याचा कट नांदेडमधील एका टोळीने रचला असल्याचा संशय व्यक्‍त केला होता. याबाबत परभणी येथे नानलपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री या संदर्भात फिर्याद दिल्यानंतर खळबळ उडाली होती. 

या प्रकरणी नांदेड पोलिसांनी तपास सुरू केला होता. बुधवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयावरून एकाला अटक केली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे समजते; परंतू अटक केलेल्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही.

 

Exit mobile version