Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात यापुढे शिवसेनेचा खासदार निवडून येणार ! : संजय राऊत (video)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना सज्ज असून आता आमच्या पक्षाचा खासदार सुध्दा निवडून आणणार असल्याची भावना शिवसैनिकांची असल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. ते आज जळगावातील पक्षाच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. 

जळगावात आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महापौर सौ. जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या पक्ष बांधणीच्या संदर्भात आपण उत्तर महाराष्ट्राचा दौरात करत असून याच अनुषंगाने जळगावात बैठक घेतली आहे. यातून पक्षाला बळ देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. तसेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाटचालीबाबत आवश्यक ते निर्णय घेतली जातील अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई आणि कोकणाच्या नंतर जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अतिशय मजबूत असेच आहे. आजवर पक्षाने ग्रामपंचायत सदस्यांपासून ते आमदार आणि मंत्री दिलेत. आता यामुळे शिवसेनेचा खासदार द्यावा अशी सर्व शिवसैनिकांची भावना असल्याचे संजय राऊत म्हणाले. तर कोणतीही निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी आपण सज्ज असल्याचेही त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.

दरम्यान, जळगाव महापालिकेतील सत्तांतराबाबत पालकमंत्री व संपर्क प्रमुख हे अंधारात नव्हते, तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्च केल्यानंतरच जळगावात सत्तांतर झाल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. तर पक्षात जुन्या-नव्यांचा संघर्ष नसल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.

Exit mobile version