Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात कॉंग्रेसकडुन शिवसेना आमदाराचा निषेध

पाचोरा प्रतिनिधी ।  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असुन यात कॉंग्रेस हा मुख्य घटक पक्ष आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासकाच्या पदावरून कॉंग्रेसला डावलण्याचे काम शिवसेनेचे आ. पाटील यांनी केल्याने कॉंग्रेस पदाधिकाऱ्‍यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकार चे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रमुख आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून कॉग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे काम करीत आहेत. असे असतांना पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आ. किशोर पाटील हे आघाडीचे प्रमुख आहेत म्हणजेच पालक आहे. पंरतु काहीं घटना अशा घडल्याकी पालक पालका सारखे न वागता बालका सारखे वागत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले ते पुढे म्हणाले की, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ बरखास्त झाले यासाठी ऑगस्ट २०२० मध्ये पाचोरा विश्राम गृहात एक गोपनिय बैठक शिवसेनेचे आ. किशोर पाटील व राष्ट्रवादीचे माजी आ. दिलीप वाघ यांनी केली आणि यात त्यांनी दोघा पक्षांचे प्रशासक म्हणून कोणते पदाधिकारी घ्यायचे हे ठरवले. त्यानंतर यालाही शिवसेना आ. किशोर पाटील यांनी तिलांजली देत स्वतः च्या पक्षाच्याच १८ पदाधिकारी यांची यादी दि. १४ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना स्वतः च्या लेटर हेडवर शिफारस केल्याचे आ. पाटील यांचे लेटरहेड पत्रकार परिषदेत पुरावे म्हणून दाखवले.

मात्र तत्कालीन संचालक मंडळ उच्च न्यायालयात गेल्याने त्यांना स्थगिती मिळाली म्हणून हा विषय जैसे थे थांबला मात्र पुन्हा शासनाने संचालक मंडळ बरखास्त केले म्हणून दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ याच्या सह पाच लोकांची यादी पाठवली यावेळी कॉग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असतांना आम्हाला विश्वासात नघेता कॉग्रेस ला डावलण्याचा प्रकार केल्याने याचा आम्ही निषेध करतो असे सचिन सोमवंशी यांनी सांगितले ते म्हणाले की, आ. किशोर पाटील यांनी महाविकास आघाडीत ठिणगी पाडु नये कारण याचा वनवा महाराष्ट्रात पटोले आणि महाविकास आघाडीचे प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्रास होईल असे करु नये अशी आमची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सह कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले आणि जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील यांना देखील या बाबतीत ची लेखी तक्रार केली आहे. नवीन प्रशासक मंडळात अल्पसंख्याक समाजातील लोकांना डावलले हे देखील महत्त्वाचे आहे येणाऱ्या काळात आ. किशोर पाटील यांनी कॉग्रेस ला दुजाभावाची वागणूक देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. 

यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, शिवराम पाटील, महिला आघाडीच्या शिला सुर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version