Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीला लागणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेले अपात्रतेचा वाद प्रकरणाचा निकालचा मुहूर्त ठरला असून या १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेनंतर निकाल लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचे बोलले जात आहे.

विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरु आहे. निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहे. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. शिवसेनेतल्या आमदार अपात्रतेवर ४ महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी १० जानेवारीला महत्त्वाचा निकाल देणार आहेत. नार्वेकरांचा काय फैसला येणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांचा निकाल तयार असल्याचीही माहिती आहे.

आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांचा निकाल तयार असल्याचीही माहिती आहे. या निकालपत्राच्या मसुद्यावर दिल्लीतील कायदेतज्ज्ञांचाही अभिप्राय घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी ७ जानेवारीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीकाही करण्यात आली आहे. आपआपली केस अधिक मजबूत करण्यासाठी त्यानुसार दोन्ही गटाच्या आमदारांनी साक्ष दिली. यानंतर उलट तपासणी दरम्यानह आपली भूमिका कायद्याला धरून होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देतात याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version