Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा मतदारसंघात शिवसेनेच्या लताबाई सोनवणे आघाडीवर

Latabai Sonawne

चोपडा, प्रतिनिधी | चौदाव्या फेरी अखेर चोपडा विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या लताबाई सोनवणे यांनी आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात आधी राष्ट्रवादी चे जगदीशचंद्र वळवी यांनी आघाडी घेतली होती, परंतु, आता शिवसेनेने आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

चोपडा मतदारसंघात शिवसेनेच्या लताबाई सोनवणे यांना अकराव्या फेरी अखेर ३२ हजार ९८२ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र वळवी यांना ३० हजार ८८२ मते मिळाली आहेत. या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर लताबाई सोनवणे ह्या  बाराव्या फेरी अखेर १९०२ मतांनी आघाडीवर आहेत.  १३ व्या फेरी अखेर वळवी यांना ३६ हजार ४३६,  लताबाई सोनवणे यांना ३८ हजार ६८०, प्रभाकर सोनवणे यांना १८ हजार २४५, तर डॉ.चंद्रकांत बोरोले यांना १२ हजार २५ मते मिळाली आहेत.  १४व्य फेरी अखेर वळवी यांना ३९ हजार १६६ तर सोनवणे यांना ४१ हजार ६४६ मते  मिळाली आहेत.

Exit mobile version