Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना बनली आहे सोनिया सेना : कंगना

 

मुंबई प्रतिनिधी । ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. आज सत्तेसाठी तीच विचारधारा विकून शिवसेना सोनिया सेना बनली असल्याची टीका अभिनेत्री कंगना राणावत हिने केली आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिने आज शिवसेना पक्षावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ”ज्या गुंडांनी पाठीमागून माझे घर तोडले त्यांना सिविक बॉडी म्हणू नका. संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका”, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. आज सत्तेसाठी तीच विचारधारा विकून शिवसेना सोनिया सेना बनली असल्याची टीका देखील तिने केली आहे.

कंगनाने काल मुंबईत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर आज तिने शिवसेनेवर टीका केली आहे.

Exit mobile version