Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेतर्फे मराठी व उर्दू शाळेत शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

IMG 20190729 WA0087

 

भुसावळ (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील फेकरी व निभोरा बु. या गावांमध्ये शिवसेनेच्या वतीने नुकतेच शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.

 

शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्या सूचनेनुसार व तालुका प्रमुख समाधान महाजन सर यांच्या मार्गदर्शने युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पाटील यांच्यातर्फे निंभोरा बु .फेकरी येथे मराठी शाळा व ऊर्दू शाळा या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शालेय साहित्य उपजिल्हा संघटक विलासजी मुळे यांच्या हस्ते शालेय साहित्य व नागरिकांना वृक्ष वाटप करण्यात आले.

तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये उपजिल्हा प्रमुख प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवासैनिकांनी वृक्षारोपण करीत सामाजिक संदेश दिला आहे. भविष्यातील संकटाची चाहूल आताच लागलेली असून सावधान होऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याने २०० वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवीण पाटील यांनी कळवली आहे.

प्रसंगी विधानसभा क्षेत्र संघटक निलेश सुरळकर पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, शिवादादा भोई,फेकरी शाखा प्रमुख निलेश बऱ्हाटे, कृष्णा पाटील, शिवसैनिक यशवंत भिरुड, युवा सैनिक कमलेश बऱ्हाटे, अमोल टेकाडे, दिलीप भिरुड, अकील शहा, भैया सोनवणे, स्वप्निल शिंदे, विशाल महाजन, धीरज भोई, निखिल धनगर, दुर्गेश भोई शिवसैनिक व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Exit mobile version